वसंत जाग्वारने पटकाविले विजेतेपद

निगडी – इंडियन बिझनेस क्‍लबच्या (आयबीएस) वतीने आयोजित केलेल्या आयबीएस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत वसंत जाग्वार संघाने 14 धावांनी विजेतेपद पटकावले. तर जय भवानी संघ उपविजेता ठरला. अंतिम सामना वसंत जाग्वार संघ आणि जय भवानी संघ यांच्यात रंगला. मदनलाल धिंग्रा मैदानावर ही स्पर्धा पार पडली.

बक्षीस वितरण प्रसंगी राजस्थानचे माजी रणजीपटू व प्रशिक्षक कैलास गट्टाणी, वसंत ग्रुपचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, उद्योजक रंगनाथ गोडगे, आयबीएसचे संचालक अनिल मित्तल, दिलीप मॅथ्यू, अभय खिंवसरा, क्रीडा संचालक कैलाश पारिक, कृष्णकुमार पारिक, नितेश मकवाना, प्रयोजक अरुण मित्तल, सुनील मित्तल आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी अभिषेक दाणी उत्कृष्ट फलंदाज, ओमप्रकाश शर्मा उत्कृष्ट झेलपटू, अश्‍मित पारिक उत्कृष्ट यष्टीरक्षक, वैभव बोरा उत्कृष्ट गोलंदाज, अविनाश मांडले यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित केले. फेयर गुड स्पोर्टसमनशिप म्हणून दुर्गा फायटर संघाचा गौरव केला. स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले होते. अभय खिंवसरा यांनी सूत्रसंचलन केले व आभार मानले. समालोचन राज सायलू यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)