वळसे येथील अपघातात दोघे जखमी

नागठाणे, दि. 8(प्रतिनिधी)- ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर वळसे (ता. सातारा) गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.शनिवारी सकाळी हा अपघात झाला. अमोल सदाशिव येवले (मूळ रा. त्रिमली, ता. खटाव, हल्ली. सातारा) व हणमंत बाबुराव जाधव(रा. लिंबाचीवाडी, ता. सातारा) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे त्रिमली येथील रहिवासी असणारे अमोल येवले यांचे देशमुखनगर (सातारा) येथे खतविक्री दुकान आहे. शनिवारी सकाळी अमोल येवले हे नेहमीप्रमाणे देशमुखनगरला दुकानावर येण्यासाठी निघाले. यावेळी हणमंत जाधव हे त्यांच्यासोबतच घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी सकाळी 10 च्या सुमारास वळसे गावच्या हद्दीत उड्डाणापुलावर आली असता त्यांची दुचाकी व मालट्रक यांचा अपघात झाला. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ सातारा येथे पाठवले. अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिस ठाण्याचे मनोहर सुर्वे व किरण निकम यांनी तात्काळ धाव घेतली. अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत बोरगाव पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)