वळती फिडरवरील अधिभार कमी होणार

उरुळी कांचन- उरुळीकांचन उपविभागातील वळती येथील 22 केव्ही क्षमतेच्या फिडरवरील विजेच्या अतिभाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. उपविभागीय कार्यालयाने वीज पुरवठा भार समांतर करण्यासाठी कोरेगावमूळ रेल्वे गेट आणि लोणी काळभोर या दोन ठिकाणी रेल्वे भूमिगत वीज जोड देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, या परवानगीला पुणे विभागीय रेल्वे प्रबंधक (वाणिज्य) यांच्याकडून संमती देण्यात आल्याने आता उरुळी कांचन, वळती, तरडे, इनामदारवस्ती, सोरतापवाडी, शिंदवणे परिसरात समांतर वीजपुरवठा करणे शक्‍य होणार असल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली आहे.
हवेली तालुक्‍यातील उरुळी कांचन, वळती, तरडे, इनामदारवस्ती, सोरतापवाडी, शिंदवणे येथील परिसरात सातत्याने वाढणारे शहरीकरण आणि थेऊर केंद्रातून विजेचा पुरवठा करणारी वाहिनी जीर्ण झाल्याने वळती (ता. हवेली) येथील फिडरवरील अधिभारावर ताण येत असे. त्यामुळे या गावांत वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. मात्र, या फिडरचा भाग कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील फिडरला जोडण्यासाठी कोरेगावमूळ रेल्वे गेट व लोणी काळभोर येथील राजेंद्र हॉटेलच्या मागे भूमिगत केबल टाकण्यास रेल्वेची परवानगी आवश्‍यक होती; मात्र, या परवानगीस रेल्वे प्रशासनाकडून विलंब होत होता. या परवानगीची दिरंगाई पाहता आमदार बाबुराव पाचर्णे थेट केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे रेल्वेचा परवानगी देण्याची मागणी केली होती. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा सूचनेनंतर पुणे विभागीय रेल्वे वाणिज्य प्रबंधक जे.पी. मिश्रा यांनी संमती देऊन भूमिगत रेल्वे जोड देण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कामाच्या परवानगीसाठी वळतीचे माजी सरपंच एल. बी. कुंजीर आणि प्रसाद कुंजीर यांनी देखील पाठपुरवा केला होता.
या कामाला मिळालेल्या परवानगीने आता उरुळी कांचन (प्रभाग 1), इनामदारवस्ती, मानससरोवर कॉलनी हा भाग कोरेगावमूळ फिडरवर जोडण्यात येणार आहे, तर लोणी काळभोर गावचा पुरवठा फुरसुंगी उपकेंद्राला जोडण्यात येणार आहे. या ठिकाणी रेल्वे प्रशासकाडून भूमिगत वीज जोड देण्यास परवानगी दिल्याने वळती फिडरचा अतिभाराचा प्रश्न मिटणार आहे.

  • वीज वितरण्याच्या या योजनेमुळे सोरतापवाडी, वळतीसह परिसरातील इतर गावांचे भारनियमन कमी होणार असून, या भागाला त्याचा चांगला फायदा होणार आहे.
    सुदर्शन चौधरी, सरपंच, सोरतापवाडी
  • रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे भूमिगत वीज जोड देण्यास परवानगी मिळाल्याने या ठिकाणी वीज जोड देण्याच्या कामाचे टेंडर काढून ठेकेदार नेमण्यात येईल. हे काम पूर्ण करून वळती आणि लोणी काळभोरचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे.
    प्रदीप सुरवसे, उप कार्यकारी अभियंता, उरुळी कांचन उपविभाग

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)