वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

नारायणगाव- पुणे-नाशिक महामार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भोसले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवार (दि. 14) रात्री 3.30 वाजता वारूळवाडी येथे घडली.
या अपघातात राजेंद्र प्रकाश पाटील (वय 31, रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे व संध्या दिलीप पाटील (वय 48, रा. जळगाव) हे मृत्युमुखी पडले आहेत. तर सुनील पाटील, मुकेश पवार, रोहित पाटील गंभीर जखमी आहेत. या घटनेची फिर्याद योगेश पाटील (रा. जळगाव) यांनी दिली आहे. या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 3.30 च्या सुमारास राजेंद्र पाटील वेगणार गाडीतून (एम. एच. 14 जी. यू. 6512) खेडहुन शिर्डीकडे जात होते. त्यावेळी वारूळवाडी हद्दीतील कोठारी व्हील्स शोरूमजवळ नारायणगावच्या दिशेने जात असताना वळणाचा अंदाज न आल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रोडच्या कडेला गेली.
यावेळी गाडीत संध्या दिलीप पाटील, सुनील प्रल्हाद पाटील, मुकेश शिवाजी पवार, रोहित गजानन पाटील व चालक राजेंद्र पाटील असे पाचजण होते. यापैकी राजेंद्र प्रकाश पाटील व संध्या दिलीप पाटील हे जागीच मृत्युमुखी पडले. तर सुनील पाटील, मुकेश पवार, रोहित पाटील गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर भोसले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राजेंद्र पाटील हे मूळचे जळगावचे असून खेड, राजगुरूनगर येथे राहत होते. ते टुरिस्टचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तर संध्या पाटील या जळगावच्या असून त्या गृहिणी होत्या. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. यापुढील तपास नारायणगाव पोलीस हे करीत आहेत.

  • दिशादर्शक बोर्ड लावण्याची मागणी
    पुणे-नाशिक महामार्गावरील वारूळवाडी हद्दीत पुण्याहून येताना व नारायणगाव येथून पुण्याच्या दिशेने जाताना असणारा जुना महामार्ग बाह्य वळणाला जोडला आहे; परंतु राष्टीय महामार्ग विभागाने रस्त्याच्या कडेला कुठेही वळणावर रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसणारे दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वळणाचा व रस्त्यांचा अंदाज न आल्याने गंभीर अपघात होतात. यामध्ये आतापर्यत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष आहे. महामार्गावर रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसणारे रेडियमचे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी प्रवाशी व वाहन चालकांनी केली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)