वल्लभनगर एस. टी. आगार तोट्यात

पिंपरी – दिवसें-दिवस वाढत्या डिझेल, पेट्रोल दरामुळे वल्लभनगर एस. टी. महामंडळाच्या आगाराला “बुरे दिन’ आले असून उत्पादनापेक्षा खर्चच जास्त झाला असल्याने आगार तोट्यात आले आहे.

वल्लभनगर आगारातून राज्यभर बस धावतात. सध्या वाढत्या डिझेलच्या किंमतीने आगार तोट्यात सुरु आहे.पिंपरी-चिंचवड शहरात बहुसंख्येने कोकणवासीय वास्तव्यास असल्याने त्यांच्या सोयीसाठी तसेच शिवाजीनगर, स्वारगेट आगारावरील ताण कमी करण्यासाठी निर्मिती करण्यात आली आहे. आगाराच्या मालकीच्या 54 गाड्या असून त्यात 33 लाल परी, 14 हिरकणी, 8 शिवशाही अशा गाड्यांचा समावेश आहे. वल्लभनगरहून 50 टक्के गाड्या कोकण विभागात फेऱ्या मारतात. उर्वरीत राज्यातील इतर भागात जातात.

-Ads-

दिवसाला आगाराच्या गाड्यांना सुमारे 5 हजार लिटर डिझेल लागते. एस. टी. बसची टाकी अडीचशे लिटरची असल्याने त्यात दररोज डिझेल भरावे लागते. प्रवासी असो अथवा नसो डिझेल तेवढेच लागत असल्याने कधी कधी जास्त उत्पादन तर कधी तोट्यात फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यात सातत्याने डिझेलची होणारी दरवाढ एस. टी. प्रशासनासाठी डोकेदुखी झाली असून त्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची भर पडणार आहे. सध्या 71 रुपये प्रती लिटरने एस. टी. आगारात डिझेल मिळत आहे. यामुळे एस. टी. प्रशासनाला तिकीट दरवाढ केल्या शिवाय गत्यंतर नाही, असे चित्र आहे. याची पूर्वसूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे.

– एस. टी. ला सरासरी इतके लागते डिझेल
लाल परी – एक लिटर डिझेलमध्ये 4 किलो मिटर अंतर कापते.
शिवशाही – एक लिटर डिझेलमध्ये 3 किलो मिटर अंतर कापते.
एशियाड बस – एक लिटर डिझेलमध्ये 3 किलो मिटर अंतर कापते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)