वल्लभनगर आगाराची दिवाळी समाधानकारक

पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) वल्लभनगर येथील आगाराला यंदाच्या दिवाळीत समाधानकारक उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी एस. टी. च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यामुळे संप पुकारला होता. त्यामुळे एस. टी. चे बजेट कोलमडले होते. यंदा गेल्यावर्षीच्या महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी जय्यत तयारी केली व त्याला काही अंशी यश मिळाले असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.

यंदा एस. टी. च्या वल्लभनगर आगाराला 30 लाखांच्या घरात उत्पन्न येणे अपेक्षित होते. त्यानुसार प्रशासनातील सर्वांनी तो आकडा गाठण्यासाठी नियोजन केले होते. यावर्षी दिवाळी तोंडावर आली असताना सुद्धा प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आगाराला ऐन दिवाळीच्या तोंडावर काही गाड्याच्या फेऱ्या बंद करण्याची नामुष्की आली होती. मात्र 3 नोव्हेंबरपासून आगारात प्रवाशांची गर्दी वाढत गेली आणि जादा सुरु केलेल्या 10 गाड्या आणि इतर नियमीत 52 अशा 62 गाड्यांना मोठा प्रतिसाद मिळाला.

-Ads-

गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा 5 टक्के महसूल जादा मिळाला आहे. यंदा उत्पन्नवाढीसाठी टप्प्यानुसार 75 पैसे ते 1 रुपयांपर्यंत दरवाढ केली आहे. ही दरवाढ केवळ दिवाळीच्या दरम्यान असून, 20 नोव्हेंबरपर्यंत ती असणार आहे. दोन वर्षापूर्वी आगाराला साधारणतः 19 लाख उत्पन्न दिवाळीला मिळाले होते. यावर्षी 20 नोव्हेंबरपर्यंत 30 लाखांचे महसुलाचे उत्पन्नाचे लक्ष पुर्ण होणार की नाही याकडे आगार प्रशासनाचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)