वऱ्हाडी घेऊन जाणारी क्रुझर पलटली, 4 ठार

परभणी – विवाह सोहळ्यानंतर वऱ्हाडी मंडळी परतीच्या प्रवासात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सेलू तालुक्‍यातील रायपूर येथील वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी उलटली व रस्त्यातच पलटी खाऊन फरफटत गेली. ही घटना गिरगाव फाट्याजवळ घडली. यात 4 जण ठार झाले तर 6 लोक जखमी झाले आहेत.

जालना जिल्ह्यातील वतुर फाटा येथील भगास कुटुंबातील मुलाचा विवाह सेलू तालुक्‍यातील रायपूर येथील गाडेकर कुटुंबातील मुलीसोबत होता.विवाहानंतर वर पक्षाकडील वऱ्हाडी जेवणानंतर परतीच्या प्रवासात असताना ही घटना घडली. अपघाताच्या वेळी गाडीत 20 प्रवाशी असल्याची माहिती घटना स्थळावरून मिळाली आहे.

मंठा येतील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या कल्याण श्रीराम बादल, भीमराव नभाजी शिंदे, शरद बालासाहेब रोहीणकर, गीताराम वायाळ सर्व राहणार जालना आदी. चार जणांना मृत घोषित केले.तर आकाश राजेंद्र पांचाळ, रमेश गणपत खवण, भानुदास अंबादास बगस यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तसेच यातील उर्वरित जखमींना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेमुळे संपूर्ण विवाह समारंभावर शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)