वऱ्हाडाच्या कारचा अपघात : नवरदेवाच्या वडिलांसह ७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : गाजियाबादच्या वियज नगरमध्ये एक कार महामार्गावरुन नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत नवरदेवाच्या वडिलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ ते ३ जण जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना विजय नगरच्या एनएच २४ महामार्गावर घडली.

गाजियाबादच्या अकबरपूर बेहरामपूरच्या राहणाऱ्या २१ वर्षाच्या रवी रस्तोगी याच्या लग्नासाठी  वऱ्हाड निघालं होतं. १२ नातेवाईकांसोबत नवरदेवाचे वडील गाडीत बसले. पुढे ट्रॅफीक असल्याने ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेत असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये रवी रस्तोगीचे वडील दुर्गा प्रसाद रस्तोगी यांचाही समावेश आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)