वर्ष पूर्ण होण्याआधीच रस्ते उखडले

दहिवडी : शंभू महादेव सोसायटीमधील उखडला गेलेला सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता.

दहिवडी नगरपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

दहिवडी,दि. 15 (प्रतिनिधी) – नगरपंचायतीने 2017-18 मध्ये दहिवडीमध्ये अनेक रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र, एक वर्ष पूर्ण होण्याआधीच अनेक रस्ते उखडले गेले आहेत. त्यामुळे नगरपंचायत बांधकाम अभियंता यांची चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या कामात असणारी अनियमित कामे व गैरव्यवहार बाहेर येतील.
मागील वर्षी सुवर्ण जयंती नगरोत्थानमधून प्रभाग 13 मध्ये एक लाख 87 हजार रुपये खर्चून शंभू महादेव सोसायटीमध्ये सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता मागील वर्षी तयार केला होता. एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच हा रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना अनेक नागरिकांनी निकृष्ट असल्याच्या तक्रारी देखील केल्या मात्र, नगरपंचायत अधिकारी व अभियंता यांनी दुर्लक्ष केल्याचे नागरिक बोलत आहेत.
बांधकाम अभियंता यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचे लाखो रुपये ठेकदारच्या खिशात गेले आहेत. त्यामुळे या ठेकेदाराची वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच या रस्त्याची देखभाल दुरूस्ती न करता पुन्हा हा रस्ता उखडून तयार करण्यात यावा तसेच याची टेस्ट रिपोर्ट देखील अभियंता यांनी स्वतः घेऊन सातारला पाहणी करून आणावेत अशी मागणी नागरिक करत आहेत. कोट्यवधींची कामे नगरपंचायतीने केली आहेत. मात्र, या सर्व कामांमध्ये चिरीमिरीसाठी रस्त्याची अवस्था “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी झाली आहे. ठेकदाराची बिले काढणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत टक्केवारीचा खेळ चालतो. त्यामुळे रस्त्याचा दर्जा सुधारणार कसा? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

-Ads-

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)