वर्षाला 90 हजार कोटींची बचत – अरुण जेटली

नवी दिल्ली – आधार कार्डासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. न्यायिक आढाव्यानंतर आधारची संकल्पना मान्य करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

अरुण जेटली म्हणाले, 21व्या शतकात तंत्रज्ञानाला नाकारु शकत नाही. ते सुशासनाचे एक साधन आहे. कुठलेही सरकार तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करु शकत नाही. आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. पात्र असलेल्या लाभार्थ्यांची ओळख पटवून वर्षाला सरकारचे 90 हजार कोटी रुपयांची बचत करत आहोत, असे जेटली यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस पक्ष आधार कार्डाचा प्रणेता आहे, पण आता तेच या कार्डाचे सर्वात मोठे विरोधक आहेत. कॉंग्रेसने आधारची संकल्पना मांडली पण त्याची कशी अंमलबजावणी करायची ते त्यांना कळले नाही, अशा शब्दात जेटलींनी कॉंग्रेसवर टीका केली. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष नंदन नीलकेणी आणि विद्ममान सरकारमधील मुकुल पांडे यांच्या कार्याचे जेटली यांनी यावेळी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)