वर्षभरात राज्यातील 57 हजार किमीचे रस्ते खड्डेमुक्‍त – पाटील

संग्रहित छायाचित्र

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर – राज्यात रस्ते विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले असून गेल्या वर्षी राज्यातील 57 हजार कि.मी.चे रस्ते खड्डेमुक्त केले आहेत. ग्रामीण भागातील 30 हजार कि.मी.चे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हाती घेतले असून ते रस्ते अधिक दर्जेदार, गुणवत्ता प्रदान करण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नव्यानेच कार्यान्वित केलेल्या रोड प्रोग्रेस मॉनिटरींग सेल अर्थात वॉर रुमचे उद्‌घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, सर्जेराव पाटील, सर्जेदार पाटील (पेरिडकर), अंबरिषसिंह घाटगे, विशांत महापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात 2 लाख 56 हजार कि.मी.चे ग्रामीण रस्ते असून हे रस्ते प्रामुख्याने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या उद्देशाने केल्याने काही ठिकाणी हे रस्ते खराब झाले आहेत. हे रस्ते अधिक दर्जेदार बनविण्यासाठी शासनामार्फत पुढाकार घेतला. राज्याच्या ग्रामीण भागातील 30 हजार कि.मी.चे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हाती घेतले आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील अतिवृष्टी व पूरहानी तसेच वाहतूक वरदळीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 12 कोटी 50 लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून 185 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामाच्या नियंत्रणासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने वॉर रुम ही संकल्पना कार्यान्वित केली असून यामुळे या रस्त्यांच्या कामांना निश्‍चितपणे गती मिळेल. तसेच ही कामे अतिशय दर्जेदार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)