वर्षभरात रस्त्यावरील डांबर उखडले

तळेगाव स्टेशन – तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर ते वराळे चौक रस्त्याची चाळण झाली असून, अवघ्या वर्षभरात रस्त्यावरील डांबर उखडले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खड्‌डेमय झाला आहे. तसेच या रस्त्यावरून बांधकामासाठी आवश्‍यक साहित्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्यावरील खडी उखडली आहे. त्यामुळे वाहनचालक, नागरिकांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते.

खडी, माती रस्त्यावर पडते आहे. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्‌डे पडले आहेत. सर्वत्र दगड व खडी पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक केल्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्‌डे बुजवावेत, अशी मागणी वराळे नागरिकांनी केली आहे.

हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. एम.आय.डी.सी.कडे जाणारी अवजड वाहने, गवळी, कामगार, विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात. दुचाकीस्वारांना व पादचाऱ्यांना खड्‌डे चुकविताना कसरत करावी लागते. पावसाळा असल्याने खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे लहानमोठे अपघात घडतात.
मागील वर्षी या रस्त्याचे काही ठिकाणी कॉंक्रीटीकरण केले, तर इंद्रायणी मंगल कार्यालयापासून पुढे डांबरीकरण केले आहे. मात्र संततधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्‌डे पडून रस्ता उखडला आहे.

या परिसरात सुमारे 80 गणेश मंडळे आहेत. तसेच अनंत चतुर्थीला घरोघरी गणपतीची स्थापना करण्यात येते. गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व गणपती मंडळाच्या मिरवणुका व घरगुती गणपती या रस्त्याने आंबी पुलाजवळील इंद्रायणी नदीवर जातात. त्यामुळे गणेश विसर्जन या खड्ड्यामध्येच करावे का असा सवाल नागरिकांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)