वर्षभरात केला व्यापक संपर्क – उपरराष्ट्रपती

नवी दिल्ली – उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांना या पदावर येऊन वर्ष पुर्ण झाले आहे. या वर्षभराच्या अवधीत आपण समाजातल्या विविध घटकांशी व्यापक संपर्क साधला असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की या वर्षभरात देशातील 29 पैकी 28 राज्यांमध्ये आपण दौरे केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दौऱ्यांमध्ये विद्यार्थी, युवक, शेतकरी, विज्ञान व तंत्रज्ञान संस्था तसच सांस्कृतीक कार्यक्रमांना आपण भेटी देऊन त्यांच्याशी आपण संवाद साधला. वर्षभरात आपण दिल्ली बाहेर एकूण 313 कार्यक्रम केल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्षभरात 28 राज्यांना भेट देण्याचा विक्रम करणारे ते पहिले उपरराष्ट्रपती आहेत, देशातील केवळ सिक्कीम राज्याला अद्याप त्यांची भेट झालेली नाही अन्यथा सर्वच राज्यांमध्ये त्यांनी जाऊन कार्यक्रम केले आहेत अशी माहिती त्यांच्या सचिवालयानेही ट्‌विटरवर दिली आहे.

या अवधीत त्यांनी 56 विद्यापीठांना भेटी दिल्या तसेच 29 पदवीदान सोहोळ्यात बीज भाषण केले. देशाचे 13 वे उपरराष्ट्रपती म्हणून नायडु यांनी गेल्या वर्षी 11 ऑगस्टला आपला पदभार सांभाळला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)