वर्षभरात अस्वच्छतेच्या 50 हजार ऑनलाईन तक्रारी

स्वच्छता ऍपचा नागरिकांकडून वापर : पालिका अधिकाऱ्यांची माहिती

पुणे- शहरात कुठे कचरा पडला आहे, कुठे पाळीव प्राणी किंवा पक्षी मरून दुर्गंधी पसरली आहे, कुठे प्लॅस्टिक अनधिकृतरित्या वापरले जात आहे, कुठे चुकीच्या पध्दतीने कचरा जातो आहे तर कुठे डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे अशा अनेक घटनांबाबत नागरिक आता पालिकेच्या ऍपचा वापर करून तक्रार करत आहेत. मागील वर्षी 1 एप्रिलपासून ते 31 मार्च 2018 पर्यंत पुण्यातून 50 हजार 304 नागरिकांनी तक्रार केली आहे.
पुणे महापालिकेच्या पीएमसी केअर अंतर्गत सुरू असणाऱ्या स्वच्छता ऍपच्या माध्यमातून नागरिकांच्या रोजच्या जगण्यातल्या अनेक समस्या सोडविल्या जात आहे. पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे या ऍपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निवारण केले जाते. याबाबत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप म्हणाले, नागरिकांच्या ज्या काही समस्या असतात ते नागरिक या ऍपच्या माध्यमातून नोंदवतात. त्यानंतर या ऍपच्याच माध्यमातून आम्ही त्या त्या विभागातील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आरोग्य निरीक्षकांना त्याचे वाटप करतो. पुढील दोन दिवसांत त्या समस्येबाबत कारवाई केली जाते.

विश्रामबागवाडा-कसबा क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे म्हणाले, हे काम जवळपास दीडशे आरोग्य निरीक्षकांमार्फत चालते. आमच्याकडे कचरा, पाणीगळती, कचरा, डासांचा त्रास आदी तक्रारी येतात. त्यानंतर दोनच दिवसांत आम्ही तक्रारीनुसार कार्यवाही करतो. गेल्या सात ते आठ महिन्यांत माझ्याकडे ऍपच्या माध्यमातून साडेसातशे तक्रारी आल्या आहेत. त्यातील काही किरकोळ वगळता सर्व तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्लॅस्टिकबाबतही आम्ही सध्या मोठी कारवाई करत असून प्लॅस्टिकबंदी आल्यापासून आमच्या विभागात जवळपास सातशे किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे.

पालिकेच्या ऍपच्या माध्यमातून तक्रारी नोंदविण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरात 50 हजार 304 नागरिकांनी या ऍपवर तक्रारी नोंदविल्या आहेत व त्यातील 2 हजार 56 तक्रारी बाद ठरविण्यात आल्या आहेत; तर 48 हजार 248 तक्रारी सोडविल्या आहेत. – सुरेश जगताप, विभागप्रमुख, घनकचरा व्यवस्थापन

तक्रारीसाठी हे ऍप वापरा
swachhata MOHUA App


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)