वर्ल्ड हिंदु कॉंग्रेसला मोहन भागवत करणार संबोधित

वॉशिंग्टन – शिकागो येथे या आठवड्यात वर्ल्ड हिंदु कॉंग्रेस आयोजित करण्यात आली असून या अधिवेशनात सरसंघचालक मोहन भागवत यांचेही विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी जगभरातील 80 देशांतील 2500 प्रतिनिधी निमंत्रीत करण्यात आले आहेत.

7 ने 9 सप्टेंबर या अवधीत हे आधिवेशन होणार आहे. थिंक कलेक्‍टीव्हली, अचिव्ह व्हॅलिएंटली अशी या आधिवेशनाची थिम आहे. जगभरातील हिंदु समाज संघटीत करण्यासाठी वर्ल्ड हिंदु कॉंग्रेसची स्थापना करण्यात आली आहे.

तथापी ही काही धार्मिक संघटना नाही तर लोककल्याणासाठी आणि जगरातील अन्य लोकांच्या मदतीसाठी कार्यरत असणारी व त्यांना चांगल्या विचारांची प्रेरणा देणारी ही चळवळ आहे असे या संघटनेचे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले. या अधिवेशनात 250 व्यक्तींची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. शिक्षण, आरोग्य, माध्यमे, राजकारण, महिला, युवक इत्यादी विषयांवर यावेळी व्याख्याने आणि चर्चा सत्रे होणार आहेत.

या अधिवेशनात एकाच वेळी सात समांतर परिषदा चालणार आहेत असे ते म्हणाले. अमेरिकेतील विश्‍व हिंदु परिषदेचे अध्यक्ष अभय अस्थाना हे या कॉंग्रेसचे निमंत्रक आहेत. ते म्हणाले की जगभरातील हिंदुंना कनेक्‍ट करण्याबरोबरच एकमेकांच्या नवीन कल्पना ऐकण्याची संधी या अधिवेशनात उपलब्ध होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)