वर्ये पुलावर वाहतूक कोंडी

रामनगर – वर्ये येथील वेण्णा नदी पात्रात सोमवारी गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आलेल्या भाविकांमुळे नदीवर असणाऱ्या पुलावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. दरम्यान, तासभर झालेल्या या कोंडीमुळे दोन्ही बाजुंना वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

सोमवारी गौरी-गणपती विसर्जनामुळे दुपारपासूनच सातारा शहरासह वर्ये परिसरातील नागरिकांनी वर्ये येथील वेण्णा नदीपात्रात विसर्जनासाठी गर्दी केली होती. नदी परिसरातील गावांमधील नागरिक डोक्‍यावर तसेच दुचाकीवर गणपती घेऊन विसर्जनासाठी घेऊन येत होते. तर सातारा शहरातील नागरिक हे आपआपल्या चारचाकी वाहनांमधून विसर्जनासाठी गणपती घेऊन येते.

तसेच गणपती नदीत विसर्जनासाठी नेत असतानाच नागरिक आपली वाहने पुलावरच कडेला लावत होती. त्यामुळे वाढत असलेल्या नागरिकांमुळे वाहनांची संख्याही वाढली आणि रस्त्यावर वाहतुकीला अडथळा येऊ लागला दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान गणपती विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांची गदीं वाढल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होती. जवळपास तासभर या पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. हळूहळू या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)