वर्ध्यात लसीकरणानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू 

वर्धा: वर्ध्यातील सावंगी (मेघे) येथील नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा “हिपॅटायटीस बी’च्या लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला. ही दुर्देवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. हिमानी रवींद्र मलोंडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. हिमानी ही सावंगी येथील राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिंगची बी एससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.

शुक्रवारी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना “हिपॅटायटीस बी’ ही लस देण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास दहा विद्यार्थिनींना रिऍक्‍शन झाली. इतर विद्यार्थिनींच्या प्रकृती सुधारणा होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली. मात्र हिमानी मलोंडेची प्रकृती गंभीर झाल्याने आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आज पहाटे तिचा मृत्यू झाला.

हिमानीच्या मैत्रीणीनं लसीकरणानंतर तिची प्रकृती बिघडल्याची माहिती दिल्याचे वडिलांनी सांगितले. तांत्रिक बाबी माहिती नसून औषधीत दोष असू शकतो, असा अंदाज हिमानीच्या वडिलांनी वर्तवला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी हिमानीच्या वडिलांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)