वर्तमान : एनडीएची फाटाफूट : महागठबंधनची तूटातूट..!   

शांताराम वाघ 

विद्यमान राजकीय परिस्थितीत आजतरी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये आणि भाजपविरोधकांच्या महाबंधन आघाडीत फाटाफूट दिसत आहे. लोकसभेचे मैदान जसेजसे जवळ येईल तसेतसे त्यात बदलही होतील. पण आजतरी दोन्हीही आघाडीचे चित्र अस्पष्ट व धूसर आहे असे दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए या सरकाररूढ आघाडीला अलिकडच्या काळांत पडती कळा लागली असे दिसते. प्रथम आघाडीतील तेलगू देशम पक्ष आंध्र प्रदेशला जादा आर्थिक मदतीच्या कारणास्तव एनडीएतून बाहेर पडला. सुमारे चार वर्षे सत्तेत असतांना त्यांना आर्थिक मदतीची जरूर वाटली नाही. जसजसे लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले, तशीतशी त्यांना आंध्र प्रदेशच्या जादा आर्थिक मदतीची स्वप्ने पडू लागली. त्यांनी बाहेर पडून एनडीएचा पाठिंबाही काढून घेतला.

इतकेच नव्हे तर तेलगणांच्या निवडणुकीत कॉंगेसशी आघाडी करून भाजपा विरूध्द निवडणुक लढविली. त्यानंतर एनडीएतील उपेंद्र कुशवाह यानी एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यांचे तीन खासदार होते. बिहारमधील जनता दल व भाजपा यांच्या पक्षाने जी जागांची वाटणी केली, त्यामध्ये लोकजनशक्ती या पक्षाला समाधानकारक वाटा मिळाला नाही तर तेही एनडीएतून बाहेर पडतील. त्यांच्या पक्षाचे चिराग पासवान यानी आठ दिवसाची यासाठी मुदत दिली आहे. या मुदतीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर तेही कदाचित एनडीए सोडतील. स्वाभीमान पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार राजू शेट्टी यानी बरेच दिवसापुर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. बाकी छोटे पक्ष नगण्य आहेत.

आत एनडीए मध्ये 18 खासदारांचा पाठिंबा असलेला मोठा एकमेव पक्ष शिवसेना आहे. त्या पाठोपाठ चार खासदारांचे बळ असलेला शिरोमणी अकाली दल हा पंजाबमधील सुरवातीपासूनच एनडीएचा पार्टनर आहे. त्याचीही एनडीएबद्दल नाराजी आहे. पण पंजाबमध्ये कॉंग़्रेस सत्तारूढअसल्याने त्यांना भाजपासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेचे आत्तापर्यंतचे धोरण सत्तेत राहून टीका करण्याचे आहे. पण तो महाराष्ट्रात युतीत भागीदारअसल्याने त्याला बाजूला करणे भाजपाला शक्‍य नाही. पण “एकला चलो रे’चा नारा शिवसेनेने आत्तापर्यंत चालू ठेवला आहे. शेवटी त्यांना भाजपाशिवाय पर्याय नाही हे जरी खरे असले तरीही ते केव्हाही स्वतंत्रही लढू शकतात. पण पाच राज्यांच्या पराभवानंतर आता भाजपाला शिवसेनेचीे गरज भासू लागली आहे. अशा परीस्थितीत ते विधानसभा व लोकसभेच्या जास्तीतजास्त जागा मागू शकतात.

थोडक्‍यांत जे वातावरण 2014 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएकडे होते त्याचा आता मागमूसही राहिलेला नाही. तामीळनाडूमधील एआयएडीएमकेमध्येही जयललितानंतर बरीच फाटाफूट झालीआहे. कदाचित तो पक्ष भाजपाला पाठिंबा देईल. कारण तामीळनाडूतील विरोधी डीएमकेने कॉंग्रेसप्रणित आघाडीला पाठिंबा दिला आहे. थोडक्‍यात एनडीएचे पुर्वीचे बरेच मित्र आघाडी सोडून जात आहेत असेच चित्र आज तरी दिसते आहे.

इकडे विरोधी महागटबंधन आघाडीतही सारे काही आलबेल आहे असे नाही. कर्नाटकमधील कॉंग्रेस व जेडीयू यांच्या संयुक्त सरकारमधील कुमारस्वामींचे सरकार तेथे सत्तारूढ झाल्यानंतर कुमारस्वामींच्या शपथविधीला जवळजवळ सर्वच भाजपा विरोधी पक्षांनीएकवटून पाठिंबा दिला होता. त्यानंतर पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये राजस्तान, मध्य प्रदेश व छतीसगड येथे कॉंग्रेसची सरकारे अधिकारारूढ झाली. अर्थात यामागे मायावतींचा बसपा व अखिलेश यादवांचा सपा यांचाही मोठा वाटा होता. त्यांच्या जरी जागा कमी होत्या तरीही त्यांचा पाठिंबा बहुमताच्या दृष्टीने मध्य प्रदेशमधील एक टर्निंग पॉईंटही होता.

या पाच राज्यांच्या निवडणुकानंतर कॉंगेस पक्षाबरोबर बसपा, सपा, द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग़्रेस, जेडीयू इत्यादी पक्षांची आघाडी होईल अशी चिन्हे होती. तथापि उत्तर प्रदेशमध्ये बसपा व सपा यानी आपआपसांत 38 व 37 सीटसची वाटणी केली. रायबरेली व अमेठी या परंपरागत कॉंगेसच्या जागा सोडून बाकीच्या सर्व जागा लढविणार असल्याची तयारी केली. कॉग्रेसला त्यांनी या बाबतीत अंधारातच ठेवले. दरम्यानच्या काळांत द्रमुक पक्षाचे नवीन अध्यक्ष स्टॅलिन यानी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत राहूल गांधींच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे मायावती व ममता बॅनजी नाराज झाल्या. त्यांच्या मते अजून पंतप्रधानपदाच्या नावाला सहमती व्हावयाची आहे.

एकूणच आता लोकसभेच्या निवडणुका जेमतेम 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत होत आहेत. व तोपर्यंत हा खेळ दोनही आघाडीत असाच चालू राहणार आहे. आताच्या वातावरणाप्रमाणे एनडीएला पुर्वीसारखा मित्र पक्षांचा पाठिंबा मिळणे अवघड वाटते. त्यामुळे भाजपाची नाजुक स्थिती झाली आहे.

काही मित्र पक्ष जेवढ्या जागा वाढतील तेवढ्या पदरांत पाडून घेण्याच्या तयारीत आहेत. तर विरोधी महागठबंधन आघाडीत बसपा व सपा यानी आघाडी करून आघाडीच्या एकतेला सुरूंग लावला आहे. प्रादेशिक पक्ष जसे ममता बॅनजींचा टीएमसी व ओरीसाच्या पटनाईकांचा बीजेडी व चंद्रशेखरराव यांची राष्टीय तेलंगणा समिती इत्यादि पक्ष आपला स्वतंत्र बाणा कायम ठेवून काम करीत आहेत. ते त्यांचे हुकमी पत्त्ते लोकसभेच्या निवडणुकीनंतरच उघडतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)