वर्तमानाचे भान ठेवण्याची गरजेचे

अमोल घोडके : बारामतीत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

बारामती- भारतातील 56 टक्के संपत्ती ही अवघ्या एक टक्के लोकांकडे आहे. तर निसर्गाची मोठ्या प्रमाणात हेळसांड करणारा भारतही अग्रेसर आहे. शिक्षण आरोग्य आणि कार्यक्षमता तपासूण विकासाच्या वेगाकडे पाहता आले पाहिजे. या तीन गोष्टी विकासात महत्त्वाच्या मुलभूत साधनात आहेत. विकास हा वर्तमानावर असतो त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्तमानाचे भान ठेवण्याची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत शांत राहून स्पर्धा परीक्षेत उतरायचे असते असे आवाहन युनिक ऍकॅडमीतील तज्ज्ञ मार्गदर्शक अमोल घोडके यांनी केले.
विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि युनिक ऍकॅडमि यांच्या संयुक्‍त विद्यमाने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “मानव संसाधन विकास’ या विषयावर घोडके बोलत होते. यावेळी वसंत घुले, डॉ. सुनिल ओगले आदि मान्यवर उपस्थित होते.
अमोल घोडके म्हणले की,मानव विकासाची व्याख्या मेहबूब उल हक व अमर्त्य सेन या दोन शास्त्रज्ञांनी अतिशय सविस्त्र मांडलेली आहे. याचमुळे मानव विकास हा विषय अतिशय सविस्तर स्वरुपात समोर आला आहे. आज कॅनडात बाटलीबंद हवा विकत घ्यावी लागते तर भारतातील 14 शहरे तीव्र वायू प्रदर्शनग्रस्त आहेत. त्यामुळे विकासाची व्याख्या निश्‍चितपणे बदलावी लागेल. शाश्‍वत विकास हा 1982 नंतर मांडणी स्वरुपात आला त्यानंतर जगाचा विकासाचा दृष्टिकोन व निसर्गाची लूट या विषयी चर्चा सुरू झाली.
भविष्य हे वर्तमानावर अवलंबून असते. अपेक्षांचे ओझे ठेवताना वर्तमानाचे भान ठेवण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिखित स्वरुपाचे नियोजन करुन प्रथमत: प्रश्‍नपत्रिका आणि आभ्यासक्रम हा अतिशय व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिंतन, प्रत्यक्ष कल्पना या समजून घेण्याची जास्त गरज आहे. म्हणून सर्व विषय हे महत्त्वाचे आहेत हे मान्य करायला पाहिजे त्यातीलच मानव संसाधन विकास हा एक महत्त्वाचा विषय आहे. जगाच्या एकूणच विकासाबाबत तज्ञांमध्ये द्वंद आहे. औद्योगिक विकास आणि पर्यावरणीय विकास याबद्दल निश्‍चित असे मापदंड तयार झालेले असून हे मापदंड देखील द्वंदाच्या स्वरुपात आहेत, असे त्यांनी नमूद केले. विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रास्ताविक डॉ. प्रा. सुनिल ओगले, तर सूत्रसंचलन स्नेहल मोरे यांनी करून आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)