वर्तमानपत्र वाटणाऱ्या मुुलांना कर्ण फौंडेशनची प्रेमाची उबदार भेट

सातारा – थंडीच्या कडाक्‍यात दररोज नित्यनियमाने वेळेवर वर्तमानपत्र वाटणाऱ्या मुलांना कर्ण फौंडेशनने प्रेमाची उबदार भेट म्हणून स्वेटर, कानटोपी, हॅन्डग्लोव्हज, सॉक्‍स आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी किशोर शिंदे म्हणाले की वृत्तपत्र वाटणाऱ्या मुलांना थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची खुप आवश्‍यकता असते.

त्यासाठी शासनामार्फत त्यांना सुविधा मिळायला हव्यात. या दुर्लक्षित घटकाकडे शासनाने जरी दुर्लक्ष केले असले, तरी कर्ण फौंडेशनसारखे काही मदतीचे हात आहेत, की जे त्यांच्या समस्या जाणून घेतील. या फौंडेशनच्या उपक्रमामुळे समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमात भिकाजीराव सूर्यवंशी, आनंद निकम, दत्तात्रय सांगलीकर, रणछोड गोसावी, राजाराम मोहिते, सिध्दी कोल्हापूरे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)