वर्गणी न दिल्याने तरुणाला मारहाण

पिंपरी – गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार चिंचडवडमधील रामनगर येथे घडला.

मयूर संजय विटेकर (वय-19, रा. शेलार चाळ, रामनगर, चिंचवड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव माने (वय-22), रमजान शेख (वय-19, दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) व अन्य एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूरची रामनगर मध्ये वडापावची हातगाडी आहे. वैभव, रमजान व त्यांचा आणखी एक मित्र यांनी किसनला गणपती उत्सवाची वर्गणी मागितली. त्यावरून आरोपी व किसनमध्ये वाद सुरु झाले. वैभवने गाडीवरील झारा उचलून किसनला मारहाण केली. रमजान व अन्य एका आरोपीने किरणला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी मयूर गेला असता वैभवने सिमेंटचा गट्टू त्याच्या डोक्‍यावर मारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)