वर्गणीसाठी डोक्‍यात दगड घातला

भोसरी – देवीची वर्गणी न दिल्यावरून तिघांनी मिळून वडील आणि मुलाला मारहाण केली. मुलाच्या डोक्‍यात दगड घातल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 25) रात्री दहाच्या सुमारास भोसरीतील बालाजीनगर येथे घडली.

मितेश रघुनाथ धनवे (वय-26, रा. मारुती मंदिराजवळ, बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार प्रशांत सुनील कांबळे, संदीप व साहील (पूर्ण नाव माहीत नाही)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मितेश एमआयडीसी भोसरी येथे नोकरी करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ते आणि त्यांचे वडील जेवण करत होते. त्यावेळी तिघे आरोपी घरामध्ये घुसले. त्यांनी जबरदस्तीने मितेश यांना वर्गणी मागितली. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. आरोपींनी रघुनाथ यांना शिवीगाळ केली. तसेच मितेश यांच्या डोक्‍यात दगड घातला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)