“वर्कआऊट’साठी तरुणाई जिममध्ये

पिंपरी – वर्षभरात व्यायाम करण्यासाठी बहुतांशी प्रमाणात तरुणाई हिवाळ्याचा मुहूर्त शोधत असते. गेल्या काही दिवसात थंडीची चाहूल लागली असून या दिवसात शरीराला व्यायाम मानवत असल्याने शहरातील तरुणांची पाऊले जिमकडे वळू लागली आहेत.

वाढत्या शहरीकरणामुंळे प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत जागरुक झाला आहे. सध्या स्पर्धेच्या युगात धावपळ आणि ताणतणाव वाढत चालल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. अनेक तरुणांमध्ये बैठे काम, स्थूलपणा, उंचीच्या प्रमाणात कमी वजन, व्यायामाचा अभाव दिसून येतो. यामुळे, अनेक तरुणांना कमी वयातच आयोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत. यामुळे, तरुणांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी अनेक तरुण-तरुणी जिममध्ये जाऊन “वर्कआऊट’ करताना दिसतात. थंडीच्या दिवसात तरुणाई फिटनेसकडे जास्त लक्ष देऊ लागतात. मात्र, आरोग्याच्या तक्रारी कमी करण्यासाठी व्यायामात सातत्य राखण्याची आवश्‍यकता आहे. थंडीच्या दिवसामध्ये शरिराला व्यायामाची जास्त आवश्‍यकता असल्याने आरोग्य संवर्धनासाठी महिलाही जिमकडे वळूू लागल्या आहेत.

सध्याच्या काळात अनेक जिम खास महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या आहेत. तसेच, सध्या फॅशनच्या दुनियेत कपड्याप्रमाणेच स्लीम दिसण्याची क्रेझ महिला व मुलींमध्ये दिसून येते. थोडेदेखील जाड झाल्यास लगेच डायट अथवा जिम सुरू केली जाते. तसेच, मुलांमध्येही “सिक्‍स पॅक’ करण्याची “क्रेझ’ दिसून येत आहे. शहरातील छोट्या-मोठ्या जिमपासून सगळीकडे तरुण-तरुणी गर्दी करताना दिसतात. जिममध्ये जाण्यासाठी वेगळा पेहराव लागतो. व्यायाम करताना प्रचंड घाम असल्याने जिमला जाताना घाम शोषणारे कपडे घालणे गरजेचे असते. पोशाखासोबतच बॅगदेखील आवश्‍यक आहे. तुमच्या बॅगेत कपड्यांसोबत पाण्याची बाटली, एक टॉवेल, ग्लुकोज, डिओड्रंट, शूज या सारख्या गोष्टी न चुकता ठेवण्याची गरज असते.

मागील काही वर्षापूर्वी जिम अथवा व्यायाम करुन करिअरच्या दृष्टीने कोणताही फायदा होणार नाही अशा पध्दतीने टिप्पणी केली जात होती. मात्र, गेल्या दोन वर्षापासून या क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी तयार झालेल्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धा गाजविणाऱ्या स्पर्धकांना प्रशासकीय सेवेत राज्य सरकारने संधी दिलेल्या आहेत. या क्षेत्रात आवड असलेल्यांना जिममध्ये ट्रेनर, जिम इन्स्ट्रक्‍टर, पर्सनल ट्रेनर होण्याची चांगली संधी असल्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्यामुळे जीमला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. तसेच, काही तरुण या क्षेत्राकडे करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून बघत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)