वरूण आणि अनुष्काच्या चाहत्यांना गणेशोत्सवाच्या हटके शुभेच्छा

महाराष्ट्रासह देशभरात आज लाडक्या बाप्पाचे आगमन उत्साहात होत आहे. बाप्पाच्या भक्तिरसात बॉलिवूड इंडस्ट्रीही न्हाऊन  निघाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

वरुण आणि अनुष्काचा आगामी ‘सुई-धागा’ चित्रपटाचे प्रमोशन जोरात चालू असून याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त केवळ सुई-दोऱ्याने गणपतीची मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती बनवितानाचा संपूर्ण व्हिडीओ अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंवर शेअर केला आहे. गाणपती बाप्पाचा हा व्हिडीओ करताना अनुष्काने लिहले कि, गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर इको-फ्रेंडली गणपती बाप्पा, अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ एका तासात एक लाखांपेक्षा जास्त युजर्सनी बघितला आहे.

दरम्यान, सुई-धागा हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून वरुण धवन आणि अनुष्का शर्मावर अनेक विनोदी मीम्स व्हायरल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)