वरुण धवन करतो आहे “सिक्‍स पॅक’ बॉडी

वरुण धवनच्या नावावर एक आगळा वेगळा रेकॉर्ड जमा झाले आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत एकही फ्लॉप सिनेमा दिलेला नाही. वरुण धवनचा नुकताच रिलीज झालेला “ऑक्‍टोबर’ खूपच हिट झाला आहे. त्यातील वरुणच्या ऍक्‍टिंगची तर जरा जास्तीच चर्चा होते आहे. त्यातील बनिता संधू लोकांना जास्तच भावली. सध्या तो “कलंक’ सिनेमाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. यातील ऍक्‍शनपॅक्‍ड रोलसाठी तो आपली बॉडी सिक्‍स पॅक करण्याच्या मागे लागलेला आहे. त्यासाठी तो जीममध्ये रोज घाम गाळतो आहे. वर्कआऊटच्या वेळचे काही फोटो त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये हा वरुण धवन आहे, हे ओळखूही येत नाही.

सध्या त्याच्या “सुई धागा’चेही शुटिंग सुरू आहे. त्यामुळे वेळेची बचत करत वरुण धवन वर्कआऊटचे वेळापत्रक सांभाळतो आहे. फाळणीच्या पार्श्‍वभुमीवरील या सिनेमामध्ये वरुण आणि आलिया भटशिवाय संजय दत्त आणि माधुरी दीक्षितही असणार आहेत. याशिवाय आदित्य राय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा हे देखील “कलंक’मध्ये असणार आहेत, असे समजले आहे. त्याशिवाय रेमो डिसोझाच्या “एबीसीडी’या डान्सवर आधारीत सिनेमासाठीही वरुण तयारी करतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)