वरुणला ‘ही’ एकच गोष्ट नसल्याची आहे खंत

अभिनेता वरुण धवण आज यशाच्या शिखरावर आहे. त्याच्याकडे ऐश्वर्य, प्रसिद्धी, पैसा सगळे काही आहे. मात्र, तरीही त्याला आपल्याकडे एकच गोष्ट नसल्याची खंत मनाला टोचनी देत आहे. त्याने नुकतच एका मुलाखतीत याचा खुलास केला आहे.

वरुण म्हणतो, तुमच्याकडे यश आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे. पण तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तुमच्याकडे वेळ नाही. माझ्यामते, यापेक्षा वाईट गोष्ट कुठलीही असू शकत नाही. मला सध्या वारंवार ही एकच भावना मनाला छळतेय. मी इतका व्यस्त असतो की, माझ्याकडे माझ्या आपल्यांसाठीही वेळ नाही. आई-वडीलांना मला पुरेसा वेळ देता नाही. शिवाय भाऊ आजारी असातानाही मला त्याला भेटता आले नसल्याचेही त्याने सांगितले. मी लोकांच्या मनोरंजनासाठी काम करतो. यामुळे मला पैसा, प्रसिद्धी, यश मिळते. पण हे यश म्हणजे, दुधारी तलवार आहे. ती कायम जवळ बाळगणे कठीण आहे. शेवटी काही ना काही कमतरता राहू जातेच, असेही तो म्हणाला. वरुण आगामी अक्‍टूबर सिनेमात झळकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)