वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा आजपासून संप

पुणे – राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक विविध मागण्यांसाठी दि. 25 सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जवळपास 80 टक्के प्राध्यापक या संपात सहभागी होणार असल्याचा दावा एमफुक्‍टो या संघटनेने केला आहे.

प्राध्यापक भरती पुन्हा सुरू करावी, 71 दिवसांचे थकित वेतन मिळावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, घड्याळी तासिका तत्त्वावरील आणि करार तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवावे, 2005 नंतर सेवेत आलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नामनिर्देशन पद्धतीमुळे झालेला गोंधळ दूर करण्यासाठी विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करून वटहुकुम काढावा, अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनाची स्वतंत्र नियमावली करावी अशा मागण्या आहेत. राज्य सरकारकडे वारंवार मागण्या मांडूनही त्याबाबत सरकारने काहीच कार्यवाही न केल्याने आता बेमुदत संप केला जाणार आहे. या पूर्वी 11 सप्टेंबरला एक दिवसाचा संपही झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यभरातील जवळपास 80 टक्के प्राध्यापक संपात सहभागी होणार आहेत. संप केल्यास वेतन न मिळण्याच्या भीतीने उर्वरित प्राध्यापक सहभागी होणार नाहीत. मात्र, राज्यातील सर्व विद्यापीठातील प्राध्यापक संपाबाबत अनुकुल आहेत. हा संप नक्कीच यशस्वी होईल, असे एमफुक्‍टोचे सरचिटणीस प्राचार्य डॉ. एस. पी. लवांडे यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण
संघटनेकडून प्राध्यापकांच्या संपाचा इशारा या पूर्वीच देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, सरकारकडून संघटनेला चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मंगळवारी ( 25 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. लवांडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)