वरिष्ठ आंतरजिल्हा बॉस्केटबॉल स्पर्धा : पुण्याचा एकतर्फी विजय

 धुळे संघावर 70-31 गुणांनी दणदणीत मात
पुणे – महाराष्ट्र राज्य बॉस्केटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित 68व्या वरिष्ठ आंतरजिल्हा बॉस्केटबॉल स्पर्धेतील महिला गटात पुणे संघाने धुळे संघावर एकतर्फी विजय मिळविला. हा सामना पुण्याने 70-31 असा गुण फरकाने जिंकत स्पर्धेत आगेकूच केली. मुंबईतील माटुंगा येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील महिलांच्या गटातील साखळी सामन्यात पुण्याच्या रुपाली त्रिपाठी (11 गुण) आणि आर्या ऋषवदकर (11 गुण) यांनी धुळे संघाविरुद्ध उत्कृष्ट खेळी केली. या सामन्यात पहिल्या हाफमध्ये 24-10 अशी मिळविलेली आघाडी कायम ठेवत धुळे संघावर दबाव आणला. दुसऱ्या हाफमध्येही तब्बल 25 गुण नोंदवित मध्यंतरापर्यंत 49-19 अशी 30 गुणांची आघाडी घेतली.

ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत पुणे संघाने धुळे संघावर 70-31 असा गुणांनी विजय मिळविला. पराभूत संघाकडून सानिका शिनकर (12 गुण) आणि करिना सुर्यवंशी (8 गुण) यांनी केलेली खेळी अपुरी ठरली.
श्रेया दांडेकर (16 गुण) आणि मिथाली पानतावणे (12 गुण) यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर नागपूरने सोलापूरवर 51-34 अशा गुण फरकाने विजय मिळविला. या सामन्यात मध्यंतराला 34-10 अशी 24 गुणांची विजयी आघाडी घेतली होती. त्यानंतर नागपूरच्या खेळाडूंनी सांघीक खेळी करत आणखी 17 गुणांची भर घालत विजयावर शिक्‍कामोर्तब केला. पराभूत संघाकडून सुप्रिया वळवी (12 गुण) हिने एकाकी प्रतिकार केला. साखळी फेरीतील अन्य एका सामन्यात चंद्रपुरने अहमदनगरचा 32-23 असा पराभव केला.

स्पर्धेचा निकाल
पुरुष गट (साखळी फेरी) – 1) उत्तर मुंबई 60 (धर्मपाल कामवत 12, शैलेश आचार्य 8) वि.वि. हिंगोली 59 (ऋषी शुल्का 19, आकाश लोखंडे 12). 2) नांदेड 64 (महेश वडजे 13, रमाजू शेख 11) वि.वि. धुळे 20 (मुकेश आहिरे 9). 3) वाशिम 61 (आर. शुभम 14, सौरभ थोसरे 13) वि.वि. सोलापूर 54 (तालक शेख 21, एम. रिझवान 13). 4) कोल्हापूर 68 (आकाश भाकरे 13, अर्शद खान 12) वि.वि. सांगली 42 (भारत पाटील 13, ओमकार नागने 10). 5) जळगाव 52 (डी. किशोर 26, एस. तजुळ 8) वि.वि. सातारा 49 (गौरव माने 23, रजत चव्हाण 10). 6) ठाणे 93 (शुभम यादव 21, ऍरान मॉन्टेरो 24) वि.वि. अमरावती 58 (प्रदीप पांढरे 17, लालधर निंगुरकर 10).

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)