वराळे ग्रामपंचायत बिनविरोध; सरपंचपदी मनीषा शिंदे

इंदोरी – राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या वराळे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच मनीषा शिंदे यांच्यासह सर्व जागा बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर शेवटी ग्रामस्थांना आणि पुढारी मंडळीना यश आले.

मावळ तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतीपैकी नानोली तर्फे चाकण (सदस्य पद बिनविरोध, सरपंच पदासाठी निवडणूक), शिलाटणे व पुसाणे या ग्रामपंचायतीसह अथक प्रयत्नानंतर वराळे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अखेर यश आले. मात्र नाणोलीतर्फे चाकणच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या असून सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. वराळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पाच, तर सदस्यपदाच्या 15 जागांसाठी 84 अर्ज दाखल झाले होते. परंतु निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही मंडळी सुरूवातीपासूनच प्रयत्नशील होती. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी दाखल झालेल्या पाच अर्जापैकी चार अर्ज व सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 84 अर्जापैकी 69 अर्ज मागे घेणे आवश्‍यक होते.

यासाठी काही ज्येष्ठ आणि राजकीय व्यक्‍तींसह ग्रामस्थांनी अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. सर्व ग्रामपंचायत बिनविरोध झाली आणि सुटकेचा नि:श्‍वास टाकला. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारावर होणारा पैसा आणि वेळ याची बचत होऊन परंपरागत चालत आलेले राजकीय वैर संपुष्टात येण्यास मदत झाली आहे. शिलाटणे, पुसाणे व वराळे ग्रामस्थांनी आणि स्थानिक नेत्यांनी निवडणूक बिनविरोध केले. मावळातील अन्य गावांसाठी एक चांगला आदर्श ठेवला आहे. भविष्यात अन्य ग्रामपंचायतींनी याचा आदर्श ठेवला, तर एक चांगला पायंडा पडू शकतो.

प्रभागनिहाय बिनविरोध उमेदवार
सरपंच – मनीषा निलेश शिंदे, प्रभाग 1 : लीला चंद्रकांत वाजे, सारिका रामदास मांडेकर, रूपाली राजाभाऊ आडाळे.प्रभाग 2 : अभिषेक ज्ञानेश्‍वर मराठे, विशाल तुकाराम मराठे, प्रियंका रामदास भेगडे. प्रभाग 3 : अस्मिता निलेश मराठे, विकास भाऊ पवार, मनिषा राम मराठे. प्रभाग 4 : अमृता प्रवीण मराठे, प्राजक्‍ता महेश राजगुरू, गणेश मच्छिंद्र मराठे.प्रभाग 5 : सीमा विकास मराठे, जनार्दन जिजाबा पारगे, निलेश दत्तात्रय मराठे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)