वरातीत नाचण्यावरून एकावर तलवार हल्ला

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) -लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या भांडणातून एकावर तलवार हल्ला झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. योगेश दत्तात्रय सपकाळ रा.धावडशी,ता.सातारा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
अविनाश विजय पवार (रा.धावडशी,ता.सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 1 रोजी गावातील एका मित्राचे लग्न होते. त्याच्या गावदेवाची वरात निघाली होती. त्यावेळी तक्रारदारासोबत अनेक युवक वरातीत नाचण्यासाठी होते. यावेळी योगेश सपकाळ याने तू मला धक्का का मारला,असे म्हणत अविनाशच्या कानफाडीत मारली. घडलेला प्रकार अविनाशने घरी सांगितला. त्यावेळी अविनाशच्या घरातील लोकं योगेशला जाब विचारण्यासाठी गेले. दरम्याने यागेश याने अविनाशवर तलवार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळलेल्या अविनाशने हल्ला आरोडाओरडा केल्याने लोकांनी त्यास वाचवला.
या हल्ल्यात अविनाश याच्या हाताला दुखापत झाली आहे. याबाबत अविनाश पवार याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पो.हवालदार राजू मुलाणी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)