वराडे येथे पतीकडून पत्नीचा खून

आईसह स्वत:वरही केले चाकूने वार; खूनाचे कारण अस्पष्ट
उंब्रज, दि. 30 (प्रतिनिधी) –
धारधार चाकूने पत्नीसह आईवर वार केल्यानंतर मुलाने स्वत:वरही चाकूने वार करून घेतल्याची घटना वराडे, ता. कराड येथे शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. या हल्ल्यात संशयीताची पत्नी मोहिनी घोरपडे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर गंभीर जखमी आई व मुलावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सागर घोरपडे यांनी कौटुंबिक कारणावरुन पत्नी मोहिनी हिच्यावर धारधार चाकूने वार केले. या हल्ल्यात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर सागर घोरपडे याने आई कल्पना सदाशिव घोरपडे यांच्यावरही चाकूने दोन वार केले. नंतर त्याच चाकूने स्वतःवरही वार केले. यामध्ये संशयीत सागर व त्याची आई गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी तिघांनाही उपचारासाठी कराडला हलविले. मात्र, उपचार सुरु असताना पत्नी मोहिनी हिचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या कल्पना व संशयीत सागर यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. सागरने हे कृत्य का केले, याबाबतचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.याबाबतची फिर्याद संतोष घाडगे यांनी तळबीड पोलिसांत दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)