वराडे घटनेतील मुलाचाही मृत्यू

हल्ल्यामागील गूढ कायम
उंब्रज, दि. 12 (प्रतिनिधी)-मुलाने पत्नी व आईवर चाकू हल्ला करून स्वत:वरही वार करून घेतल्याची घटना दि. 29 जून रोजी वराडे (ता. कराड) येथे घडली होती. त्या हल्ल्यात पत्नी जागीच ठार, तर आईसह चाकू हल्ला करणारा मुलगा गंभीर जखमी झाले होते. पाच दिवसांपूर्वी आईचा मृत्यू झाला असतानाच चाकू हल्ला करणाऱ्या मुलाचाही शुक्रवारी मृत्यू झाला. सागर सदाशिव घोरपडे, असे त्याचे नाव आहे. तिन्ही जखमींचा मृत्यू झाल्याने या हल्ल्यामागील गूढ उकलू शकले नाही.
वराडे, ता. कराड येथील सागर घोरपडे याने दि. 29 जून रोजी रात्री नऊ वाजता पत्नी मोहिनी घोरपडे आणि आई कल्पना घोरपडे यांच्यावर चाकू हल्ला करून नंतर स्वत:वरही वार केले होते. चाकूचे खोलवर वार झाल्याने पत्नी मोहिनीचा जागीच मृत्यू झाला होता, आई कल्पना यांच्यासह सागर हा गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर कल्पना व सागर घोरपडे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती. त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू असताना आई कल्पना यांचा 8 जुलै रोजी, तर संशयित सागर घोरपडे याचा शुक्रवारी मृत्यू झाला. तिन्ही जखमींचा मृत्यू झाल्याने या घटनेमागील खरे कारण उघड होऊ शकलेले नाही.
तळबीडच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांनी सागर घोरपडे याचा दोन ते तीन वेळा जबाब घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याचा जबाब नोंदविता आला नव्हता. ग्रामस्थांनाही घटनेमागील ठोस कारण समजू शकलेले नाही. त्यामुळे घटनेमागील गूढ कायम राहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)