वरवरा राव यांना कोठडी

विशेष न्यायालयाचे आदेश : नक्षल्यांशी संबंध निष्पन्न

पुणे – एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून जेष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी हैद्राबाद येथून पुन्हा अटक करून रविवारी दुपारी पुणे येथील सत्र न्यायालयात हजर केले. राव यांनी भूमिगत आरोपींसोबत मणिपूर, नेपाळमधून हत्यारे आणण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. नक्षलवादी कारवाया आणि भूमिगत असलेल्या नक्षलवादी कॉ. गणपतीच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी राव यांना 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राव यांच्याकडील तपासात ते सीपीआय (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचे वरिष्ठ नेते आहेत. अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे डिसेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे हल्ला झाला होता. त्याला देशभर प्रसिद्धी मिळाली होती. अशा प्रकारच्या घटना घडविण्यासाठी वरवरा राव यांनी निधी उपलब्ध करून दिला. उसुर, पामेद आणि भेजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहशतवादी कृत्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट झाला आहे. सुरेंद्र गडलिंग आणि राव यांनी बंदी असलेल्या “सीपीआय’ माओवादी संघटनेसाठी निधी उभारण्याचे तसेच जंगलातील कॉमरेडस्‌ना दैनंदिन खर्चासाठी निधी पोहचविण्याचे काम केले आहे. सत्यशोधन समितीमधील सदस्य व इतर सदस्यांकडून सुरक्षा यंत्रणांची माहिती भूमिगत संघटनांना (पीपल लिब्रेशन गोरिल्ला आर्मी) राव आणि गडलिंग मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, निष्पन्न झालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास, आक्षेपार्ह संदेशाबाबत तपास, सांकेतिक भाषांचा उपयोग समजाऊन घेणे, संघटना चालविताना आरोपींनी साहित्य, माहिती, शस्त्र, आर्थिक मदत कोणा-कोणाला पुरविली त्याबाबत तपास करायचा आहे. कटाचा भागा म्हणून एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारे भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या कारवाया सुरू आहेत, याचाही तपास करायचा असल्याचे सांगत जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी राव यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्याला बचाव पक्षाचे वकील अॅड. रोहन नहार, अॅड. राहुल देशमुख यांनी विरोध केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)