वरवंडी शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील वरंवडी फाट्यावरुन कुंभारवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पाझर तलावाजवळ एका ३१ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. शोभा बाबासाहेब वाघमारे (वय ३१, रा. पानेगाव-मांजरी, ता. नेवासा) असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

शुक्रवार दि. २० एप्रिल रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास वरंवडी येथील पोलीस पाटील नामदेव केदारी यांनी याची माहिती आश्वी पोलिसांना दिली. हा मृतदेह शोभा बाबासाहेब वाघमारे यांचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती आश्वी पोलिसांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)