वरवंडच्या व्हिक्‍टोरिया तलावाची पाणी पातळी घटली

गावांना दुष्काळाच्या झका

वरवंड- येथील व्हिक्‍टोरिया तलावातील पाणीसाठा संपत आल्याने या तलावावर अवलंबून असलेल्या गावांना दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. पाटस, कुसेगाव, पडवी या गावांना पाणी पुरवठा होत आहे. मात्र, या तलावातील पाणी आटल्याने या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे व्हिक्‍टोरिया तलावात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर तलावात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नाही तर मोठ्या प्रमाणात या गावात दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. तीन ते चार दिवसांपासून कुसेगाव गावचा पाणी पुरवठा बंद असल्याने महिला, लहान मुलांना तीव्र उन्हात मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असून पाण्याची पातळी खालावत आहे.

या सोबतच या तलावातून कुरकुंभ एमआयडीसीला पाणी पुरवठा होतो. या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या रासायनिक कंपन्यांना असल्याने त्यांना रोजच्या पाण्याची मागणी जास्त असते. त्यामुळे जर तलावातील पाणी आटले तर कंपन्या चालवायच्या कशा? हा मोठा प्रश्न या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना पडला आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा नाही झाला तर कंपन्यांचे उत्पादन बंद केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

  • पाटस गावातील पाणी पुरवठा योजना वरवंड येथील व्हिक्‍टोरिया तलावातील पाणी कमी झाल्याने 3-4 दिवस बंद होती. मात्र, पाटस ग्रामपंचायतीने पाटस तलावातील पाणी घेऊन आज पाणी पुरवठा सुरू केला आहे. गावाची पाणी पुरवठा योजना ही वरवंड येथील व्हिक्‍टोरिया तलावावर अवलंबून असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी व्हिक्‍टोरिया तलावात पाणी सोडण्यात यावे.
    वैजयंता म्हस्के, सरपंच पाटस
  • वरवंड येथील तलावातील पाणी संपल्याने पाणी पुरवठा योजना 3-4 दिवस बंद आहे. कुसेगावला पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकरची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
    रमेश भोसले, सरपंच कुसेगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)