वरखेड येथील दिगंबर गोरेंचा खुनच; दोघांना अटक

गोपाळपुर – नेवासा तालुक्‍यातील वरखेडमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी दिगंबर गोरे यांचा मृतदेह आढळला होता. पोलीस तपासानंतर गोरे यांचा खुन केल्याचे निष्पन्न झाले असून पोलीसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले आहे.

याबाबतची माहिती अशी की, आबासाहेब मारुती गोरे (वय 60 रा.वरखेड ता.नेवासा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, देविदास, दत्तात्रय, दिगंबर, राजेंद्र असे आम्ही पाच भाऊ आहेत. त्यात दिगंबर (वय 51) हा वगळता सर्वांची लग्ने झालेली आहेत.चार नंबरचा भाऊ दिगंबर हा आठवीत असल्यापासून गावात राहणारी मैनाबाई पोपट गंगूले या बाईकडेच राहत होता. मैनाबाई हिला नवरा तसेच मुलं बाळ नव्हते. त्यामुळे दिगंबर हा तिच्याच घरी राहत होता. तो मोठा झाल्यानंतर त्यास दारूचे व्यसन लागले. मैनाबाई ही तिची आई व दिगंबर यांच्यासह वरखेड गावातच तिच्या स्वतःच्या शेतात राहत होती. मैनाबाई हिच्या भावाचा मुलगा गंगाधर भागाजी कुंढारे हा देखील गेल्या काही दिवसांपासून मैनाबाईकडे राहत असून तोच सर्व व्यवहार सांभाळतो.
गावाजवळ साखर कारखाना होत आहे. मैनाबाई यांची जमिन या कारखान्याच्या शेजारीच असल्याने जमिनीला भाव आला. यामुळे गंगाधर कुंढारे हा सतत मैनाबाईकडे येत असे. त्यामुळे मैनाबाई व गंगाधर या दोघांना दिगंबर यांची अडचण निर्माण होत होती. त्यामुळे हे दोघे दिगंबरला नेहमी मारहाण करीत असे. दि. 24 फेब्रुवारीला मैनाबाई माझ्या घरी येऊन दिगंबर त्रास देतोय समजून सांगा असे तिने सांगितले. यापूर्वी आमच्या घरी मैनाबाई कधी आली नाही आणि दिगंबरशी जास्त संबंध नसल्याने उद्या बघू असे मैनाबाईला सांगितले होते. दि. 25 फेब्रुवारीला मैनाबाईच्या घरी गेलो असता दिगंबर हा तिच्या घरासमोरील टपरीजवळ मयत अवस्थेत आढळून आला. मानेला कशाने तरी आवळण्याची खूण स्पष्ट दिसत होती तर नाकातून व तोंडातून रक्त येत असल्याचे दिसले.औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन सोमवारी दुपारी दिगंबरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
टपरीजवळ असलेल्या शेतजमिनीचा भाव वाढल्याने दिगंबर याचा अडसर होऊ नये, म्हणूनच त्याचा खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून नेवासे पोलिसांनी मैनाबाई पोपट गंगूले व गंगाधर भागाजी कुंढारे या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

-Ads-

गावातील दारू विक्रीला लगाम लागणार का?
आरोपी मैनाबाई गंगूले हिचे वरखेड येथे बेकायदेशीर देशी दारूचे दुकान आहे.आज दिंगबर गोरेंचा मृत्यू झाला असला तरी गावामध्ये अनेक वर्षापासून दारू विक्री करून अनेकांच्या संसाराचे वाटोळे या बाईने केले आहे. अजूनही काही लोक गावात दारू विकतात. आता तरी पोलीस खाते गावातील दारू विक्रीला लगाम घातील का? का अजून यातून बळी जाईल हा मोठा प्रश्न आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)