वरकुटे-मलवडी कंपनीतील साडेतीन लाखांच्या तारेची चोरी

म्हसवड, 9 दि. (प्रतिनिधी) – वरकुटे-मलवडी हद्दीत असलेल्या एका कंपनीतील सुमारे साडेतीन लाखांच्या तांब्याची तारेची चोरी झाली आहे. याप्रकरणी व्यवस्थापकांनी पाचजणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत म्हसवड| पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आवादा पॉवर्स कंपनीचे व्यवस्थापक के. मार्टिन कंपनी यांना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कंपनीचे गेट उघडे दिसले. त्यांनी आत जावून पाहिले असता एका व्हॅनमध्ये पाच ते सहा जण तांब्याची तार भरत असताना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर गाडी तेथेच सोडून चोरटे पसार झाले. यानंतर मार्टिन यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार पोलिसांनी हुसेन इनामदार रा. वरकुटे मलवडी व विकास विरकर रा. विरकरवाडी या दोघांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी लक्ष्मण बनसोडे याची कंपनीसमोरच चहाची टपरी आहे. तपास सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नंदु खाडे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)