वय 24, पोटात 31 किलोचा ट्युमर

मेक्‍सिकोमध्ये एका महिलेचे पोट पाहून तिच्या पोटात किमान 10 गर्भ असतील, असा अंदाज होता. मात्र, डॉक्‍टरांनी तिच्या पोटाची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यासाठी पोट खोलले तेव्हा तेसुद्धा अवाक्‌ झाले. कारण त्या महिलेच्या पोटात तब्बल 31 किलोचा ट्यूमर होता. 24 वर्षी महिलेवर मेक्‍सिकोच्या जनरल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर इरिक हॅनसेन यांनी सांगितले की, महिला डाएट करत होती. तरीही तिचे वजन प्रचंड वेगाने वाढत होते. वर्षाच्या आतच तिचे पोट इतके मोठे झाले की, जणू तिच्या पोटात किमान 10 गर्भ वाढत आहेत. डॉक्‍टरांनी या महिलेची तपाणसी केली असता, तिच्या पोटात ट्यूमर असल्याचे निदान झाले. सुमारे 31 किलोचा हा कॅन्सरचा ट्यूमर काढण्यासाठी डॉक्‍टरांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली.

-Ads-

आकारात अत्यंत मोठा ट्यूमर असल्याने पोटाच्या अंतर्गत भागाचे मोठे नुकसान झाले होते. म्हणजेच हा ट्यूमर पोटाच्या 95 टक्के भागात पसरला होता. तातडीने शस्त्रक्रिया केली नसती तर महिलेल्या जीवावरही बेतले असते. डॉक्‍टरांनी सुमारे चार तासांच्या अविरत प्रयत्नानंतर 31 किलो वजनाची ट्यूमरची गाठ बाहेर काढून तिला जीवदान दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)