वन बीएचके पर्वाचे पुनरागमन (भाग-२)

नोटाबंदीचा प्रभाव जसजसा कमी होत आहे आणि रेरा कायद्याला वर्ष पूर्ण होण्याबरोबरच अर्थव्यवस्थेचा वेगही वाढत आहे, तसतसे मोठ्या शहरांमधून अनेक निवासी प्रकल्प उभे राहू लागले आहेत. अनेक कारणांमुळे गरज म्हणून घर घेणाऱ्यांची संख्या वाढत असून, जास्त क्षेत्रफळाच्या घरात पैसा गुंतविणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. गरज म्हणून घर खरेदी करणाऱ्यांसाठी सध्या अनुकूल दिवस असून, वन बीएचके पर्व पुन्हा एकदा अवतरत आहे.

वन बीएचके पर्वाचे पुनरागमन (भाग-१)

शहरांमधील काहीजण आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षे बचत करीत असतात. काही जणांचे कुटुंब मोठे असते आणि कमावणारा एकटाच असतो. अशी कुटुंबे छोट्या घरांमध्ये दाटीवाटीने राहतात आणि त्या घराचे भाडेही भरतात. काहीजणांना अशी छोटी घरे त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांकडूनही राहावयास मिळतात. त्याचे भाडे भरावे लागत नसले, तरी कुटुंब मोठे असल्यामुळे लवकरात लवकर स्वतःचे घर व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. असे लोक त्यासाठी वर्षानुवर्षे बचत करतात. बराच काळ पैसे साठविल्यानंतर त्यांना जे घर घेणे शक्‍य असते, ते वन बीएचकेच असते. काहीजण स्वतःच्या घरात निवृत्तीपर्यंतच राहू इच्छितात. नंतर ते शहर सोडून मूळगावी परततात आणि शहरातील घर आपल्या पुढच्या पिढीसाठी ठेवतात. त्यांनाही वन बीएचके फ्लॅट घेणेच अधिक जवळचे वाटते.

अनेक बांधकाम व्यावसायिक पूर्वीप्रमाणे पाचशे-साडेपाचशे चौरस फुटांची घरे न बांधता आता चारशे ते साडेचारशे चौरस फुटांची घरे बांधू लागले आहेत. अगदी टू बीएचके घराचे क्षेत्रफळही पूर्वी आठशे चौरस फुटांच्या आसपास असायचे, तेही कमी होऊन आता साडेसहाशे ते साडेसातशे चौरस फुटांवर आले आहे. याला कारणीभूत ठरलेल्या घटकांमधील एक रेरा कायदाही आहे. या कायद्यामुळे केवळ गुंतवणूक म्हणून घर घेणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. ज्यांना आवश्‍यकता म्हणून घर घ्यायचे आहे, त्यांना मोठी घरे परवडत नाहीत. असे लोक वन बीएचके फ्लॅट खरेदी करतात; किंवा कमी क्षेत्रफळ असलेला फ्लॅटही ते पसंत करतात. या सर्व कारणांमुळे आता पुन्हा एकदा वन बीएचके फ्लॅटची मागणी वाढली आहे. अशा घरांना पूर्वीही मागणी होतीच. परंतु मोठ्या घरांच्या निर्मितीत आणि विक्रीत मोठा फायदा असल्यामुळे केवळ गुंतवणूक म्हणून मोठी घरे घेणाऱ्यांसाठी घरबांधणी करण्याचा पायंडा पडला होता. ही घरे अर्थातच मोठी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरची होती. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सर्व ताकद वन बीएचके अशा घरांच्या निर्मितीत झोकून दिली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मोठ्या शहरांमध्ये वन बीएचके फ्लॅटची संकल्पना आली होती. उदारीकरणामुळे निर्माण झालेल्या शहरी जीवनशैलीचे ते प्रतीक ठरले होते. 2008-09 नंतर मात्र टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅटकडे कल वाढला. उदारीकरणामुळे हातात पैसा खेळू लागलेला वर्ग अशा मोठ्या घरांमध्ये तो गुंतवू लागला; परंतु गेल्या काही दिवसांमध्ये मात्र बांधकाम व्यावसायिकांनी पुन्हा एकदा वन बीएचके फ्लॅट बांधण्याकडे मोर्चा वळविला आहे. वन बीएचके घर परवडू शकणाऱ्या वर्गात वाढ होत असल्यामुळे हा बदल घडून आला असून, छोटी कुटुंबे तसेच कमी उत्पन्नगटातील व्यक्तींना सोप्या आणि सुरळीत भरण्याजोग्या मासिक हप्त्यांवर गृहकर्ज मिळू लागल्याने वन बीएचके पर्वाचे आता पुनरागमन झाले आहे.

– विधिषा देशपांडे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)