वन पीसची निवड

सध्या मुली जीन्स घालण्यापेक्षा ड्रेस घालायला पसंती देऊ लागल्या आहेत. साहजिकच आहे म्हणा ना, सध्याचा अंगाची लाही करणारा उन्हाळा लक्षात घेता हा पर्याय उत्तम आहे. अर्थात ड्रेस घातल्यावर टमी (पोट) दिसणं ही कित्येकींची समस्या आहे, पण म्हणून हे ड्रेस घालायचेच नाहीत असं नाही. या ड्रेसेसमध्येसुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. नेहमीच फिटेड ड्रेस घालण्याची गरज नाही. त्यासाठी अम्ब्रेला स्टाइल किंवा ए-लाइन ड्रेस ट्राय करायला हरकत नाही. हे कमरेखाली लूझ असतात. त्यामुळे पोट झाकलं जातं. एम्पायर लाइन यावेळी महत्त्वाची भूमिका बजावते. एम्पायर लाइन म्हणजे ड्रेसचे विभाजन करणारी लाइन. बिलो ब्रेस्ट एम्पायर लाइनचे ड्रेस घालून बघा. किंवा लूझ फिटेड ड्रेसला बेल्ट लावून विभाजन करता येतं. त्यामुळे ड्रेसला फिटेड लुक येतो. ड्रेस ढगळ वाटत नाही. याशिवाय एखाद्या पार्टीसाठी तुला फिटेड ड्रेस घालायचा असेलच, तर सध्या बॉडी फिटर बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्यामुळे पोटाचा घेरा काही प्रमाणात दाबला जातो. असे वन पीस वापरणे हे आजचे फॅशन स्टेटमेंट आहे.

… आणि लॉंग कुर्तीचीही
लांब कुर्ते हे फक्त उंच मुलींसाठी असतात, हा गैरसमज आहे. खरं तर योग्य प्रकारे घातले, तर हे कुर्ते सर्वांना शोभून दिसतात. त्यामुळे एखादीची उंची कमी असूनही, तिला असे कुर्ते घालावेसे वाटत असतील तर यातून त्या युवतीचा आत्मविश्वास दिसून येत असतो. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे थोडी काळजी घ्यावी लागेल. पहिलं म्हणजे, शक्‍यतो जास्त लूझ फिट कुर्ते निवडू नयेत. त्यामुळे तुमची उंची अजूनच बुटकी वाटेल. तसंच या कुर्त्यांच्या उंचीकडे लक्ष देणे गरजेचे राहील. साधारणपणे गुडघ्याच्या उंचीचे किंवा त्यापेक्षा थोडया जास्त उंचीचे कुर्ते जरूर निवडावेत, पण पायघोळ कुर्ता निवडू नये. कुर्त्यांची स्लीट मोठी असेल तर ते उत्तमच असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कुर्ते कशासोबत घातले जाणार आहेत, याचा विचार केला जाणेही गरजेचे असते.

सध्या स्ट्रेट फिट सलवार बाजारात आलेत, त्यांच्यासोबत हे कुर्ते घातले जातात. पण याऐवजी लेगिंग वापरलेस तर ते उत्तमच ठरेल. सलवार घालायचीच असल्यास मलमल, कॉटनची फिटेड वापरावी. सलवार जितकी लूझ असेल, तितकी व्यक्ती अधिक बुटकी दिसते. याशिवाय या कुर्त्यांचे स्लिव्ह फुल असतात. ते फोल्ड करून उंचीचा आभास तयार करता येईल. शिवाय यात कलर्सलाही मोठा वाव असतो, हे लक्षात ठेवावे.

– वंदना जयंत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)