वन खात नव्हे, हे शिकारी खात : आदित्य ठाकरे 

मुंबई: अवनी किंवा टी-1 या वाघिणीला मारताना नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसते. वन खाते प्राण्यांचे संरक्षण करण्याऐवजी शिकार करत आहे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केली आहे. तसेच वन खात्याचे नाव बदलून शिकारी खात असे करायला हवे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी त्यांनी वन मंत्रालयावर टीका केली आहे.

न्यायालयाकडून वाघिणीला मारण्याची परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आले नसते का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केले. उद्या तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, दहशत निर्माण करणाऱ्या यवतमाळच्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. वन विभागाने दिलेल्या या माहितीवर संशय उपस्थित करण्यात येत आहेत. बेशुद्ध करण्याचे प्रयत्न न करता थेट तिला गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर केवळ छायाचित्रासाठी या वाघिणीला डार्ट लावण्यात आला असा संशय वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)