वन खात्याला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती – सुधीर मुनगंटीवार

मुंबई: ‘अवनी’ वाघिणीला ठार केल्यानंतर राजकारण सुरु झाले आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी देखील राज्यसरकारवर टीका केली आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वन खात्याला वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती. जेरबंद करताना हल्ला केल्याने अवनीला गोळी घातली. मनेका गांधींनी वनखात्याची बैठक घ्यायला हवी होती. तसेच पथक देण्याच्या मागणीकडे मनेका गाधींनी दुर्लक्ष केलं असा आरोपही मुनगंटीवार यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)