वन क्षेत्रातील झाडे पाण्याअभावी जळाली

खडकीत चार एकरावर पावसाळ्यात केली होती लागवड

रावणगाव- खडकी (ता. दौंड) येथील वन विभागाच्या हद्दीतील क्षेत्रात नव्याने केलेली चार हेक्‍टर वृक्ष लागवड पाण्याअभावी जळून चालली असून, वन विभागाकडे या कामासाठी पाणी देण्याचे नियोजनच नसून, ही लागवड फक्त पावसाळी असून त्यावरच ती जगवली जात असल्याचे सांगत हे खाते हात झटकत आहे. परिणामी लाखो रुपयाची केलेली कामे ठेकेदारासाठी होती का का, असा प्रश्न आता ग्रामस्थ करीत आहेत.
खडकी येथील गट नं 709, 710 मधील शेतकऱ्यांकडील अतिक्रमणे वन विभागाने मागील वर्षे काढली. त्यानंतर तेथे लाखो रुपये खर्च करून जेसीबी मशीनच्या सहाय्याने दहा एकर क्षेत्रात चर घेऊन बांबू, लिंब, सिसम, करंज, चिंच, बोर यांसारखी हजारो वन्य झाडे लावली. नवीन वृक्ष लागवड असल्याने ती पाण्याअभावी लागलीच नाही. ती पूर्णपणे जळून जाण्याच्या मार्गवर आहे, यामुळे शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणाने झाले असून, याला जबाबदार कोण, असे ग्रामस्थ विचारीत आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)