वनौषधी उद्यानाच्या जागेवर प्रवासी कंपन्यांचे अतिक्रमण

चिंचवड – औद्योगिक वसाहतीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानाच्या जागेवर खासगी प्रवासी कंपन्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असल्याबद्दल नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील डी-टू ब्लॉकमध्ये सुमारे दोन एकर जागेवर वनौषधी उद्यान आहे. उद्यानाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे; परंतु त्या जागेवर खासगी प्रवासी कंपन्यांच्या बस उभ्या केल्या जात आहेत. याठिकाणी अनेक जुन्या नादुरुस्त बसही उभ्या असतात; तसेच रस्त्याच्या कडेला काही भंगार बस, मिनी बस उभ्या आहेत. त्याकडे महापालिका प्रशासन तसेच अतिक्रमण व निर्मूलन पथकाचे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या उद्यानाला पूर्वी तारेचे कुंपण होते; परंतु चोरट्यांनी लोखंडी तारा चोरून नेल्या. त्यामुळे आता सिमेंट कॉंक्रीटची सीमाभिंत बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली. सीमीभिंत नसल्याने उद्यानातील वनस्पतींच्या अस्तित्वालाही धोका संभवतो. या मार्गावरून मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची ये-जा असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता देखील पसरली आहे. हे उद्यान कधी विकसित होणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)