मंचर-चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) गावच्या आरोग्य उपकेंद्राच्या आशा स्वयंसेविका वनिता चंद्रकांत कुंजीर यांना आशा स्वयंसेविका पुरस्कार जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत सन 2017-18 चा जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे उपस्थित होते. उपकेंद्रांतर्गत आरोग्य सुविधांचा लाभ सामान्य घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना सहकार्य करण्याचे काम सेवाभावीपणे कुंजीर या करतात. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे चांडोली बुद्रुकच्या सरपंच प्रिती थोरात, युवासेना अधिकारी प्रवीण थोरात, चांडोली बुद्रुकचे विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)