वनाज ते धान्य गोदाम मार्गाचे 25 टक्‍के काम पूर्ण

मार्ग उभारणीसाठी लागणार 325 कोटी

पुणे – महामेट्रोच्या वनाज ते शिवाजीनगर (धान्य गोदाम) या मार्गाचे सुमारे 25 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. या मार्गासाठी 325 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 7.1 किलोमीटरचा हा मार्ग आहे. त्यातील 1.7 किलोमीटर मार्ग मुठा नदीपात्रातून जाणार आहे. या मार्गात एक दुहेरी उड्डाणपूलही असणार आहे. अवघ्या वर्षभरात हे काम पूर्ण झाले असल्याचे महामेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वनाज ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रोच्या कामाला गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सुरुवात झाली. पौड रस्त्यापासून कामाला सुरुवात केल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा विस्तार करण्यात आला. पौड रस्त्यानंतर नदीपात्रातील काम सुरू केले गेले. या संपूर्ण मार्गावर सुमारे 326 खांब असणार आहेत. त्यातील 150 खांबाचे फाऊंडेशन पूर्ण झालेले आहे. तर 80 खांबाचे काम पूर्ण झाले आहेत. यात नदीत पात्रात 59 खांब असणार आहेत. त्यातील बहुतांश खांब या पाईलवर असणार आहेत. याशिवाय, या मार्गावर नळस्टॉप चौकात डेक्‍कनच्या दिशेने उड्डाणपूलही असणार आहे. तो दुहेरी उड्डाणपूल असणार असून त्यावर वरील बाजूस मेट्रो मार्ग तर खालील बाजूस वाहतुकीसाठी रस्ता असणार आहे. पूर्ण झालेल्या 80 खांबांमध्ये दोन खांबांना स्पॅनद्वारे जोडण्यासाठी सव्वाचारशे सेगमेंटची निर्मिती महामेट्रोने पूर्ण केली आहे. तर आयडीएल कॉलनी, आनंद नगर तसेच डेक्‍कन आणि संभाजी उद्यानासह, महापालिके समोरील मेट्रो स्टेशनचे कामही महामेट्रोकडून या मार्गावर सुरू करण्यात आले असल्याचे गाडगीळ यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)