वनहक्क जमिनींच्या दाव्यांचा होणार निपटारा

सातारा जिल्ह्यात वनमित्र मोहिम

सातारा, दि .3 (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील वनजमिनींच्या माध्यमातून उपजिविका करणाऱ्या अनूसुचित जमाती तसेच इतर प्रवर्गातील नागरिकांना जमिनींवर दावे दाखल करता येणार आहेत. त्यासाठी शासनाने विशेष वनमित्र मोहिमेचे आयोजन केले असून त्यामाध्यमातून दाव्यांचा निपटारा केला जाणार आहे, अशी माहिती आदिवासी विभागाचे सहा.प्रकल्प अधिकारी गणेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुधारित नियमानुसार शासनाने कार्यक्रम हाती घेतला असून वनक्षेत्र ग्रामपंचायती परिसरात ग्रामसेवक, तलाठी व वनपाल यांच्या माध्यमातून वनहक्क समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून जमीनींचे दावे स्विकारले जाणार आहेत. तसेच ज्या ग्रामपंचायतींमध्ये वनहक्क समिती स्थापन केलेली नसेल त्याठीकाणी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मोहिमेमध्ये संबधित गावातील वनक्षेत्रामध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी त्यामध्ये विशेषत: अनूसुचित जमाती प्रवर्गातील नागरिक व इतर पारंपारिक वननिवासी 13 डिसेंबर 2005 पुर्वीचा व ती पिढ्यांचा अधिवास असल्याची माहिती एकत्रित करून ती अर्जाव्दारे समितीकडे सादर करावयाची आहे. अर्जावर ग्रामसभेत निर्णय होवून तो उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयाकडे छाननीसाठी पाठविण्यात येणार आहे. छाननीमध्ये अर्ज वैध ठरल्यास मंजूरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असून अंतिम मंजूरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले असल्याचे गावडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)