‘वनश्री’ पुरस्काराचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण

मुंबई  – जागतिक वन दिनाचे औचित्य साधून उद्या, 21 मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2015’ चे वितरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मंत्रालयातील तळमजल्यावर त्रिमूर्ती प्रांगणात सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन राज्यमंत्री अम्ब्रीश आत्राम, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या वन कर्मचारी आणि अधिकारी यांना 2015-16 या वर्षाकरिता पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)