वनविभागाच्या हद्दीत टाकलेल्या कोंबड्यांचे मांसमुळे दुर्गंधी

कुरकुंभ – दौंड आणि कुरकुंभ परिसरातील चिकन विक्री करणारे काही दुकानदार त्यांच्या दुकानातील कोंबड्याचे पंख, पाय, घाण, इतर अवयव लहिा विक्री न होणारे मांस जमा करून ते थेट कुरकुंभ-दौंड रस्त्यालगतच्या वनविभाग हद्दीत टाकत आहेत. यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. याबाबत कारवाई करण्यास वनविभागाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे समजते.
वनविभागाच्या हद्दीत टाकलेले कोंबड्याचे पंख, मांस, घाण हे सर्वसामान्य नागरिकांना दिसून येते. मग वनविभागाच्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कुरकुंभ-दौंड रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वनविभागाची जागा आहे. सध्या दौंड व कुरकुंभ परिसरातील चिकन विक्री करणारे काही दुकानदार त्यांच्या दुकानातील मांस भरून ते रात्रीच्या सुमारास वनविभागाच्या हद्दीत आणून टाकत आहेत. यामुळे प्रवासी, ग्रामस्थ, हैराण होत आहे. याबाबत संबंधितावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)