वनविभागाच्या जागेत अतिक्रमण

ओझर- हिवरे खुर्द (ता. जुन्नर) येथील वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून त्या ठिकाणी घर बांधून, त्यात चोरून चालू असलेला दारूधंदा त्वरित बंद करण्यात यावा, तसेच येथील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी हिवरे खुर्दचे उपसरपंच अशोक वायकर आणि टिकेकरवाडीचे सरपंच संतोष टिकेकर यांनी केली आहे.
हिवरे खुर्द (ता. जुन्नर) येथील गट क्रमांक 153 मधील 1.87 हेक्‍टर हे क्षेत्र राखीव वन आहे. पुष्पावती नदीच्या केटी बंधाऱ्यालगत असलेल्या या वनक्षेत्रात गेली अनेक वर्षे लोकशासन आंदोलकाच्या नावाखाली एक कुटुंब येथे वास्तव्यास असून त्यांनी या ठिकाणी वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून पक्के घर देखील बांधले आहे. त्या घराच्या जागेत त्यांनी त्यांचा दारूधंदा थाटला असून, हे लोक कोणालाही जुमानत नाहीत. गेली अनेक वर्षे या ठिकाणी त्यांचा धंदा जोरात चालू आहे. अवैध धंदे बंद करण्यास ग्रामस्थ गेले असता तुमचा संबंध काय, वनखाते व आम्ही बघून घेऊ, तुम्ही इकडे फिरकू नका, अशी अरेरावी या लोकांकडून ग्रामस्थांना होत आहे.
दारू व्यसनाच्या आहारी जाऊन या भागातील अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. येथे दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी देखील व्यसनाधीन होत चालली असून, असे धंदे जर गावाजवळच असतील तर याचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. वनविभागाच्या जागेतील अवैध धंद्याचा वनविभागाकडून ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा. यातील दोषी व्यक्तींवर वनकायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी हिवरे खुर्द, नेतवड, माळवाडी आणि टकिेकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

  • समस्या गंभीर पण कारवाईस दिरंगाई
    या गंभीर समस्येबाबत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना वेळोवेळी माहिती देण्यात आली असून, येथील अतिक्रमणांवर आणि दारूधंद्यांवर कारवाई करण्यास विलंब का होत आहे? यामागे आर्थिक तडजोड आणि देवाणघेवाण तर नाही ना? गेल्या वर्षी मे महिन्यात जुन्नर तालुक्‍यातील वनजमिनींवरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला होता, मग येथील अतिक्रमण का काढले नाही? अधिकारी फक्त आश्वासन देतात की येथील अतिक्रमण आम्ही लवकर काढू; पण कारवाई करताना या विभागाकडून वेळकाढूपणाचे धोरण का अवलंबवले जात आहे? वनकायदा फक्त आम्हा स्थानिक लोकांसाठी आहे का, मग हा कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? येथील अतिक्रमणांवर त्वरित कारवाई झालीच पाहिजे, असे अनेक प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)